Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

अखेर आरटीई 2024-25 प्रवेशासाठी अर्ज करण्यास सुरूवात (सुधारित प्रवेशप्रक्रिया)

अखेर आरटीई 2024-25 प्रवेशासाठी अर्ज  करण्यास सुरूवात (सुधारित प्रवेशप्रक्रिया)

Maharashtra RTE Admission 2024-25

Finally starting to apply for RTE Admission RTE Admission start


RTE Admission 2024-25 - मा. उच्च न्यायालय आदेश

यापूर्वी सन 2024-25 याकरता RTE 25 टक्क प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून आँनलाईन अर्ज हे मागवण्यात आलेले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RTE अंतर्गत यापूर्वी आँनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी आँनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या सन 2024-25 या वर्षाच्या RTE 25 टक्क प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी

अर्ज करण्याची सुरुवात - 17 मे 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मे 2024


आरटीई प्रवेश प्रक्रिया 2024-25 महाराष्ट्र : आरटीई (शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सन 2024-25 साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 16 एप्रिल 2024 पासून सुरवात झालेली होती पण जाचक नियम व अटी असल्यामुळे पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती व प्रवेश प्रक्रिया ही स्थगित करण्यात आलेली होती व उच्च न्यायालयाने 16 मे 2024 रोजी सुधारित सुचना दिल्यामुळे नव्याने अर्ज करण्यास सुरुवात ही 17 मे 2024 पासून सुरु होत आहे जे पालक सन 2024-25 साठी आरटीई अंतर्गत प्रवेश करू इच्छिता, त्यांनी अर्ज करायचा आहे आणि लेख पूर्ण वाचून घ्यायचा आहे. व माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.

माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा. 

महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2024-25

महाराष्ट्र सरकारने 16 एप्रिल 2024 पासून 30 एप्रिल 2024 दरम्यान आरटीई प्रवेश 2024-25 साठी अर्ज प्रक्रिया ही सुरु करण्यात आलेली होती. पण RTE नियमात झालेल्या बदलांमुळे यंदा कमी प्रमाणात अर्ज आल्यामुळे 10 मे 2024 पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. पण नवीन नियमांच्या विरोधात पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 17 मे 2024 पासून 31 मे 2024 पर्यंत नव्याने अर्ज हे करता येणार आहे. तरी जे पालक आरटीई 25% आरक्षित उमेदवारांसाठी अर्ज करू शकतात, ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new वर आधी सुरू करा. येथे काही सोपे क्रमाने आपल्या मुलांसाठी प्रवेश अर्ज सहज करु शकतात.

RTE 25% योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

RTE 25% योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बाबींचा अवलंब करा व योग्यप्रकारे अर्ज करुन घ्या.
  • पहिल्या टप्प्यात सर्वात आधी खाली दिलेल्या वेबसाईट वर जा.
  •  https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
  • त्यानंतर Online Application वरती क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यात New Registration लिंक वरती जाऊन विद्यार्थ्याचे Registration करायचे आहे.
  • नवीन रजिस्ट्रेशनसाठी सर्वात आधी तु्म्ही जेथे रहायला आहे तो जिल्हा, विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, जन्म तारीख, कॅप्चा आणि मोबाईल नं. टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल नं. वरती मेसेज द्वारा Username आणि Password येईल.
  •  त्यानंतर दुस-या टप्प्यात  Username आणि Password चा वापर करून पासवर्ड बदलवून घेणे
  • तिस-या टप्प्यात नवीन पासवर्ड आणि युजरनेमचा वापर करून लाॅगिन करुन घ्यावे, लाॅगिन झाल्यावर विद्यार्थ्याचे नाव,वडिलांचे नाव आणि आईचे नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये अचूकपणे भरून घ्यावे, त्यानंतर घराचा पूर्ण पत्ता भरल्यानंतर माहिती सबमिट करायची माहिती सेव केल्यानंतर गुगल मॅप Open होईल.
  • गुगल मॅपमध्ये लाल बलून अचूकपणे सेट करावा आणि सेव बटनावर क्लिक करावे.
  • यानंतर चौथ्या टप्प्यात कोणत्या वर्गात प्रवेश घ्यायचा आहे, कोणत्या माध्यमात प्रवेश घ्यायचे आहे ते निवडा, धर्म आणि कोणत्या आरक्षणा अंतर्गत प्रवेश पाहिजे ते भरा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जातीचा दाखला (Caste Certificate) असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याचे आधार आधार नं. टाकल्यानंतर सर्वात शेवटी तुमच्याकडे असलेले कागदपत्रे निवडून घ्यावे आणि माहिती चेक करुन सबमिट करायची.
  • पाचव्या टप्प्यात School Selection मध्ये आपणास ज्या-ज्या  शाळेत अॅडमिशन करायचे आहे अश्या सर्व शाळांची निवड करायची आहे. यात 1 किलोमीटरच्या आत त्यानंतर 1 ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटर पेक्षा जास्तीचे अंतरातील शाळा हा प्रकार वगळण्यात आलेला आहेत त्यामुळे आता 2 प्रकार हे राहिलेले आहे त्यानुसार निवड केल्या नंतर सर्व माहिती सेव करुन घ्यायची आहे.
  • सहाव्या टप्प्यात Form Submission मध्ये सर्व माहिती योग्यरित्या तपासून घ्यायची आहे त्यानंतरच Form Submit करायचा आहे. कारण एकदाचा अर्ज सबमिट झाल्यावर त्याच्यात कोणत्याही परिस्थितीत माहिती बदलवून मिळणार नाही तरी त्याबाबतीत काळजी घ्यावी.

महत्ताची सुचना :- यापुर्वी अर्ज केलेल्या पालकांनी पुन्हा नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील.


आवश्यक कागदपत्रे-

  1. रहिवाशी पुरावा (Residential Certificate) -रहिवास दाखला, आधार कार्ड, राशनकार्ड किंवा मतदान कार्ड
  2. जन्म दाखला (Birth Certificate)
  3. दिव्यांग असल्यास- दिव्यांगत्वाचा दाखला (Disability Certificate)
  4. जातीचा दाखला (Caste Certificate)
  5. उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  6. Medical Certificate आणि पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असल्यास (Covid-19 Death Certificate) लागू असल्यास
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement